औरंगाबाद: कैलासनगर भागात मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी चहा टपरीचालक दोन भावडांनी मतदान केल्याशिवाय चहा देणार नाही, असा फलक लावला आहे. हा फलक पाहून अनेक तरुणांनी पहिले मतदान केले व नंतर चहा घेतला. या चहावाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
रोहित श्रीवास्तव व अमित श्रीवास्तव या भावडांचे कैलासनगरमध्ये भद्रा टी स्टॉल म्हणून चहाचे हॉटेल आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, मतदान केल्याशिवाय चहा विकत देणार नाही, असा फलक त्यांनी त्यांच्या चहाच्या गाडीवर लावला आहे.